नगरसेविका भीमा फुगे यांचे नगरसेवक पद रद्द करावे : अनिल फुगे

0
पिंपरी : नगरसेविका भीमा पोपट फुगे यांचे पती पोपट फुगे यांच्या नावावर भोसरी येथे इमारत असून वरच्या मजल्यांचे अनधिकृतपणे बांधकाम झाले आहे. संबंधितांनी महापालिकेला अनधिकृत बांधकामाची कोणतीही माहिती दिली नाही. तसेच महापालिकेचे कराचे २२ लाख रुपये देखील थकीत ठेवले असल्याचा आरोप भोसरीतील सामाजिक कार्यकर्ते अनिल फुगे यांनी केला आहे .

महापालिकेची फसवणुक केल्याप्रकरणी नगरसेविका भीमा पोपट फुगे यांचे नगरसेवक पद रद्द करावे , अशी मागणी फुगे यांनी भोसरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. अनिल फुगे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेने अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी कंबर कसली आहे. शहरातील विविध ठिकाणी असणारी अनधिकृत बांधकामे महापालिकेचा अतिक्रमण विभाग जमीदोस्त करत आहे. एका बाजुला सर्वसामान्यांची घरे पाडली जात आहेत तर दुसरीकडे राजकीय पदाधिकाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांना अभय दिले जात असल्याचे चित्र आहे. भोसरीमध्ये देखील नगरसेविका भीमा पोपट फुगे यांच्या पतीच्या नावावर असलेल्या इमारतीचे बांधकाम अनधिकृतपणे केले आहे.

पुणे – नाशिक महामार्गावर उड्डाणपुलाखाली शिवगंगा कॉम्प्लेक्स या इमारतीचे वरच्या मजल्याचे बांधकाम अनधिकृतपणे वाढविण्यात आले आहे . त्याची कोणतीच परवानगी महापालिकेकडून घेण्यात आलेली नाही . तसेच वाढीव इमारतीच्या बांधकामाची माहिती महापालिकेला दिली नाही . वाढीव बांधकाम करूनही या ठिकाणी महापालिकेचा पाणीपुरवठा होत आहे . वीज पुरवठा देखील होत आहे . मात्र याची माहिती महापालिकेपासून लपवली आहे . खाली असणाऱ्या बांधकामाची नोंद आहे . मात्र विविध कराचे लाखो रुपये त्यांनी महापालिकेला महापालिकेची फसवणुक यांनी उपस्थित केला .

Leave A Reply

Your email address will not be published.