एचसीएमटीआर रस्त्याच्या कामासाठी सीआरएफ फंडातून केंद्र सरकार देणार १०० कोटीचा निधी : आबा बागुल

0

पुणे : गत काही वर्षात शहरातील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच वाहतुक नियंत्रणाबाहेर गेली आहे. मेट्रो, मोनो रेल यासह सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करण्यासाठी हालचालीही सुरू आहेत. मात्र, नियंत्रणाबाहेर गेलेल्या वाहतुकीसाठी  शाश्‍वत पर्याय ठरणाऱ्या  ‘हाय कॅपेसिटी मास्ट ट्रांझिस्ट रूटच्या अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. आज केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री मा. नितीनजी  गडकरी चांदणी चौक येथील एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आले होते.

या प्रसंगी पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी भेट घेऊन एचसीएमटीआर रस्ता पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे. याबाबत चर्चा केली त्यांनी याबाबत होकार देऊन एचसीएमटीआर रस्त्यासाठी सीआरएफ फंडातून १०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले असून पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना याबाबत लवकरात लवकर निवेदन ठेवण्यास सांगितले आहे.  त्यामुळे एचसीएमटीआरचा [रिंगरोड ] मार्ग आता सुखकर  झाला आहे.

एकूण ३६.६ किलोमीटर लांबीचा असणारा हा रस्ता संपूर्ण इलेव्हेटेड असणार आहे.  रुंदी २४ मीटरची असणार आहे. या मार्गावर ६ मार्गिका (लेन्स) असणार आहेत. त्यापैकी २ बीआरटीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. विशेषत: राष्ट्रीय महामार्गांना हा रस्ता जोडला जाणार आहे. इलेव्हेटेड असणाऱ्या या  मार्गावर बीआरटीसाठी २८ स्थानके असणार असून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या आणि यांत्रिक जिने (एलेव्हेटर्स) यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आगामी ४० वर्षात वाहतुकीत होणाऱ्या वाढीचे प्रमाण लक्षात घेऊन या मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. या मार्गावर वाहनांची वेगमर्यादा ५० किलोमीटर प्रति तास एवढी निश्चित करण्यात आली आहे. तसेच या रस्त्यावर दुचाकींना पूर्णपणे बंदी असणार  आहे.

आबा बागुल म्हणाले की ,सन २०४० पर्यंत वाहतुकीची स्थिती लक्षात घेऊन या रस्त्याचे नियोजन होणार आहे.  या मार्गासाठी ७२ हजार ३४६. ८१६ चौरस मीटर क्षेत्र अधिग्रहित करण्यात आले आहे.

मागील ३५  वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे व खडकी कॅंटोन्मेंट अंतर्गत रिंगरोड (एचसीएमटीआर) हा दिलासादायक ठरणार आहे.  दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला हा रिंग रोड आता  मार्गी लागणार असल्याने  पुणेकरांना शहरांतर्गत भेडसावणारा वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील वाहनांच्या गर्दीचा प्रश्न सुटण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल, असा विश्वासही  आबा बागुल यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.