पुणे : राज्यभर चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील अरुण राठोड या व्यक्तीचा शोध पोलीस करत आहेत.
अरुण राठोड या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पुणे पोलिसांकडून सध्या अरुण राठोडचा शोध सुरु आहे. अरुण राठोड हा सध्या बीडमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप याची कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
अरुण राठोड हा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा चेहरा असल्याचे मानलं जात आहे. ज्यावेळी पूजाने आत्महत्या केली त्यावेळी अरुण राठोड हा उपस्थित होतो. तो मूळ परळी तालुक्यातील धारावती तांडा या ठिकाणी राहत होता.
पूजाच्या राहण्याची व्यवस्था मंत्रिमहोदयांनी अरुण राठोड याच्याकडे सोपवण्यात आली होती. अरुण राठोड आणि पूजा चव्हाण याचे कोणतेही रिलेशन नाही. ते नातेवाईक नसल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे अरुण राठोडला सर्वात आधी अटक करावी, अशी मागणी पूजा चव्हाण यांच्या परळीतील नातेवाईकांनी केली आहे. अरुण राठोडला अटक झाल्यानंतर पूजाने नेमकं आत्महत्या का केली? हे प्रकरणं काय आहे? याला संजय राठोड जबाबदार आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तर समोर येणार आहेत.