सहाय्यक पोलीस निरीक्षकाची रिव्हॉल्व्हरमध्ये गोळी झाडून आत्महत्या

0
नवी मुंबई : APMC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी सरकारी रिव्हॉल्व्हरमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पोलीस ठाण्यातच पवार यांनी स्वत:वर गोळी झाडली. भूषण पवार यांना तातडीने MGM रुग्णालयात हलवण्यात आलं. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

पवार यांनी स्वत:वर गोळी का झाडून घेतली? त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय? हे अद्याप समजू शकलेलं नाही.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत APMC पोलीस ठाण्यात भूषण पवार यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. दुपारी 12च्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ माजली आहे. पोलीस ठाण्यात आपल्या दालनातच त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. भूषण पवार हे 42 वर्षांचे होते.

त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. एक वर्षापासून APMC पोलीस ठाण्यात ते सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. आत्महत्येच्या या घटनेमुळे पोलीस दलाला मोठा धक्का बसलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.