पिंपरी : जमीन आणि पूर्वीच्या वादातून दगडाने चेहरा ठेचुन तरुणाचा खून करुन फरार झालेल्या आरोपीना गुन्हे शाखा युनीट तीनच्या पथकाने अटक केली आहे.
गुन्हे शाखा युनिटचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न ज-हाड यांना माहीती मिळाली की, तळवडे ब्रिज खाली दगडाने ठेचलेला मृतदेह हा संकेत गायकवाड (रा.निघोजे ता.खेड जि.पुणे) याचा आहे. त्यानुसार वरिष्ठांना माहीती देवून निघोजे गावात जावून माहीती घेतली. त्यावेळी गावातील त्याचा नातेवाईक यांचे सोबत जमिनीवरुन वाद असल्याचे समजले.
पोलिसांनी रोहन रवींद्र जगताप (२०, रा.निघोजे ता.खेड जि.पुणे), विशाल अशोक चव्हाण (२१, रा.देहुगांव ता.हवेली जि.पुणे) यांना ताब्यात घेतले व त्यांचेकडे कसून चौकशी केली. रोहन, त्याचे दोन साथीदार विशाल चव्हाण व महाराज यांनी मिळून हा प्रकार केल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपींनी मागील वाद उकरुन काढुन दगडाने मारहाण करण्यास सुरवात केली व त्याचा चेहरा ओळखुन न येण्यासाठी त्याचे तोंडावर मोठमोठी दगडे टाकुन त्याचा खुन केल्याची धक्कादायक कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे ,पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ). सुधिर हिरेमठ , सहा पोलीस आयुक्त ( गुन्हे ) डॉ . प्रशांत अमृतकर, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर, पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले , यदु आढारी , हजरतअली पठाण , सचिन मोरे , योगेश्वर कोळेकर , राजकुमार हनमंते , त्रिनयन बाळसराफ , प्रमोद ढाकणे , जगदीश बुधवंत यांनी केली आहे .