पुण्यातील दत्तनगर परिसरात किराणा दुकानदारावर गोळीबार

0

पुणे : भारती विद्यापीठ परिसरातील दत्तनगर भागामध्ये रविवारी रात्री गोळीबार करण्यात आला. यामध्ये किराणा दुकानदार गंभीर जखमी झाला आहे.

पंजाबी नावाचे दुकानदार जखमी झाले आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबी यांचे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर भागातील शिवांजली चौकात किराणा दुकान आहे.

दरम्यान, काही वेळापूर्वी (रविवारी रात्री) अचानक आलेल्या काही हल्लेखोरांनी पंजाबी यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गोळी लागली आहे. ते गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबार का झाला आणि कोणी केला हे अद्याप समजू शकलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.