आज रात्रीपासून वाहनांना ‘फास्टॅग’ अनिवार्य

0

नवी दिल्ली : 15-16 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच आज मध्यरात्री पासून फास्टॅग न लावता राष्ट्रीय महामार्गांच्या टोल नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागणार असल्याचे रस्ते आणि वाहतूक मंत्रालयानं रविवारी सांगितल आहे.

रविवारी रात्री 12 पासून सर्व टोल प्लाझावर कॅशलेन बंद होणार आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियानं याबाबत आदेश दिले आहेत. आता वाहनांना केवळ फास्टॅगच्या माध्यमातूनच टोल भरावा लागणार आहे. आज रात्रीपासून फास्टॅग अनिवार्य केला जाणार आहे. याबाबत सरकारकडून निर्देशही देण्यात आलेले आहेत.

केंद्र सरकारनं टोल प्लाझावर टोल कलेक्शन सोपं आणि सुरक्षित बनवण्यासह टोल नाक्यांवर लागणाऱ्या लांबचलांब रांगांपासून सुटका मिळवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 15-16 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सर्व राष्ट्रीय महामार्ग फास्टॅग असणारे होतील. रोख रकमेत टोल वसूलणं बंद होणार आहे. रविवारी काढलेल्या एका निवेदनामध्ये मंत्रालयानं हे स्पष्ट केलं, की हे पाऊल डिजिटल गोष्टींना प्रोत्साहन देण्यासह प्रतीक्षाकाळ कमी करण्यासाठी उचललं गेलं आहे.


भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं दिलेल्या माहितीनुसार, आता फास्टॅग लागू करणारे बँक सिक्युरिटी डिपॉझिटव्यतिरिक्त कुठलंच किमान बॅलन्स खात्यात ठेवणं बंधनकारक करू शकत नाहीत. वाहनधारकाला टोल प्लाझावरून जाण्याची अनुमती तोवर दिली जाईल जोवर फास्टॅग खात्यात निगेटिव्ह बॅलन्स नसेल. फास्टॅग खात्यात कमी रक्कम असली तरी टोलवरून जाता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.