नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अॅसिड हल्ला करून जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र आलं आहे. याप्रकरणी नवनीत राणा यांनी नॉर्थ एव्हेन्यू पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
नवनीत राणा या लोकसभेत विविध मुद्द्यांवरून महाराष्ट्रातील सत्तेत असणाऱ्या शिवसेनेवर टीका करत असतात. 8 फेब्रुवारी रोजी देखील नवनीत राणा यांनी राज्यातील स्थितीवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
या टीकेनंतर नवनीत राणा यांना एक पत्र आलं, ज्यामध्ये थेट जीव मारण्याची धमकी देण्यात आली होती. ‘8 दिवसांत माफी मागा नाहीतर तुमच्यावर अॅसिड टाकून जीवे मारू,’ अशा आशयाचं एक पत्र नवनीत राणा यांना त्यांच्या नॉर्थ एव्हेन्यू येथील घरी आलं होतं.
या पत्रानंतर राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आणि त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.