पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 7112 कोटींचा अर्थसंकल्प ‘स्थायी’पुढे सादर

0
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2021-22 या आर्थिक अर्थसंकल्प 7 हजार 112 कोटी रुपयांचा आयुक्त राजेश पाटील यांनी आज (गुरुवारी) स्थायी समितीला सादर केला.

सभापती संतोष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या उपस्थितीत आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, विकास ढाकणे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाच्या अभ्यासाठी ही विशेष सभा 24 फेब्रुवारी पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अर्थसंकल्प तयार केला आहे. अर्थसंकल्पावर त्यांची छाप आहे. त्यांची शुक्रवारी (दि.12) पुण्यात नोंदणी महानिरीक्षकपदी बदली झाली. हर्डीकर प्रशासनाने तयार केलेला अर्थसंकल्प नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांनी स्थायी समितीला सादर केला.

Leave A Reply

Your email address will not be published.