लस घेऊनही डॉक्टर आले कोरोना पॉझिटिव्ह

0
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरने लस घेऊनही आठ दिवसातच तीचा कोरोना चाचणीचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोना रुग्णांशी थेट संपर्क येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने ससूनमधील डॉक्टांचे देखील लसीकरण झाले. या लसीकरण प्रक्रियेमध्ये गेल्या आठवड्यात या निवासी डॉक्टरला देखील लस टोचली होती.

लसीकरणापूर्वी या डॉक्टरला कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती. मात्र लसीकरणानंतर काही दिवसामध्ये अंगदुखी, सर्दी खोकला आदी लक्षणे दिसल्याने त्यांची तपासणी झाली. यात ते पुन्हा कोरोना पॉझिटीव्ह निदर्शनास आले आहे.

याबाबत ससूनचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, या डॉक्टर बाहेरगावी प्रवास करून आल्या होत्या. पुण्यात परतल्यानंतर त्यांना कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. त्यामुळे त्यांचे लसीकरण केले. मात्र लसीकरणानंतर काहीच दिवसात त्यांना लक्षणे जाणवू लागली. चाचणी केल्यानंतर त्या पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.

Leave A Reply

Your email address will not be published.