‘या’ राज्यातून पुण्यात यायच असेल तर करावी लागणार RT-PCR चाचणी

0
पुणे : पुणे शहरात संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असल्याने पुणे महापालिकेकडून खबरदारीचे उपाय योजना राबविल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने केरळ येथून पुण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला RT-PCR चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे, तसे आदेश जारी केले आहेत.

मुंबईनंतर पुण्यात कोरोनानं सर्वाधिक थैमान घातलं आहे. अथक प्रयत्नानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पुण्याला यश आले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून कमी झालेली रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. शहरातील काही भागात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.

पुणेकरांनी असंच जर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले तर राज्य सरकारकडून नवीन लॉकडाऊन केला जाऊ शकतो. कोरोनाचा हॉटस्पॉट राहिलेल्या पुण्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, काही लोकांकडून उल्लंघन केले जात असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊन होणार की नाही हा सध्यातरी प्रश्नच आहे. पुण्यातील कोणत्या भागात जास्त रुग्णसंख्या आहे त्या भागात कंटेन्मेंट झोनची घोषणा होऊ शकते असा इशारा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी दिला.

Maharashtra: Pune Municipal Corporation issues an order making it mandatory for passengers arriving from Kerala to undergo RT-PCR test on arrival#COVID19

— ANI (@ANI) February 18, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.