कोरोनाच्या नव्या विषुणाच्या रुग्ण आढळला नाही

0

यवतमाळ : देशासह राज्यात कोरोना व्हायरसने पुन्हा डोकं वर काढलं आहे. यामुळे प्रशासन पुन्हा कामाला लागले आहे. काही जिल्ह्यात संचार बंदी, नाईट कर्फ्यु लावण्यात आले आहेत. काही जिल्ह्यात 28 फेब्रुवारी प्रयत्न सर्व बंद ठेवण्यात आले आहे.

यवतमाळ मध्ये यवतमाळमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूचा रुग्ण आढळला असल्याच्या चर्चेने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार यवतमाळ येथे आढलेला हा विषाणू आधीच्या विषाणूप्रमाणेच आहे. तर अमरावती आणि अकोल्यात नव्या विषाणूचा रुग्ण आढळलेला नाही, असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला सांगितलंय.

अकोल्यातील रुग्णांचे नमुने पुण्यात एनआयव्हीकडे पाठवण्यात आलेत. तर यवतमाळमध्ये सापडलेला विषाणूही ब्रिटनमधल्या विषाणूप्रमाणे नाही, तो आधीच्या विषाणूप्रमाणेच असून त्यावर लसही प्रभावी आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.