तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न, पाठीचा कणा मोडला

0

भोपाळ : दिल्लीच्या निर्भया प्रकरणालाही हादरवून सोडलं अशी घटना भोपाळ मध्ये घडली आहे. एका तरुणाने तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असून यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे. तरुणीच्या पाठीचा कणा मोडला आहे.

भोपाळच्या कोलार परिसरामध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पीडित तरुणीवर आरोपीनं डोक्यावर दगड मारला. त्याने ढकलून दिल्यानं ती खडड्यात पडली त्यात तिच्या पाठीचा मणका तुटला. त्यानंतर तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला.

गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या पाठीच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून 42 टाके पडले आहेत. तिला सध्या स्वत:हून हालचालही करता येत नाही.

16 जानेवारीला पीडित तरुणी संध्याकाळी साडेसात वाजता नेहमीप्रमाणे वॉकला निघाले होते. त्यावेळी एक जण तिथे आला त्याने तिला जोरात धक्का दिला. ती रस्त्याच्या कडेला असलेल्या पाच फूट खोल खड्ड्यात पडली. त्यामुळे माझ्या पाठीचा मणका तुटला. त्याने तिला जबरदस्ती ओढत झुडपामध्ये नेले. त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

तिने जोरजोरात ओरडा सुरु केला. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तिने त्याच्याकडे विनंती केली. दरम्यान तिचा आवज तिथून जाणाऱ्या तरुण-तरुणीनं ऐकला. दोघंही झुडपामध्ये आले. त्या दोघांना पाहताच तो तरुण तिथेच सोडून पळून गेला, असं पीडित तरुणीने सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.