केवळ मिस कॉलद्वारे कर्ज मिळण्याची सुविधा

0

नवी दिल्ली : एसबीआयने बँकेने आपल्या ग्राहकांसाठी केवळ मिस कॉलद्वारे कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ळेल. तसेच या गोल्ड लोनवर बँक ग्राहकांना अनेक सुविधा आणि ऑफर देत आहे.

एसबीआय गोल्ड लोन योजनेत सोन्याच्या दागिन्यांव्यतिरिक्त सोन्याची नाणीदेखील ठेवता येतील. एसबीआयने या योजनेंतर्गत कर्जाची जास्तीत जास्त रक्कम काही काळापूर्वी वाढविली होती. आता सोन्यावर 20000 ते 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतले जाऊ शकते. जे आधी 20 लाखांपर्यंत होते.

एसबीआयने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, तुम्हाला स्वस्तात गोल्ड लोन घ्यायचे असेल तर यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून कस्टमर केअर नंबर 7208933143 वर मिस कॉल द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला बँकेतून बॅककॉल येईल. या कॉलमध्ये तुम्हाला कर्जाबद्दल पूर्ण माहिती मिळेल. या व्यतिरिक्त तुम्ही 7208933145 वर “GOLD” असा मेसेज करून माहिती देखील मिळवू शकता.

अधिक माहितीसाठी तुम्ही एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळालाही भेट देऊ शकता. सध्या गोल्ड लोनवरील व्याज 7.5 टक्के आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.