मुंबई : कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये वाढत असताना आता एक चिंताजनक बाब समोर आली आहे. देशात एकूण २४० नवीन करोना स्ट्रेन आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आढळेला कोरोनाच्या नवा स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून हा स्ट्रेन घातक ठरू शकतो असा इशारा दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदिप गुलिरेया यांनी दिला आहे. या नवीन स्ट्रेनमुळे कोरोनाच्या एंटीबॉडीज तयार झालेल्यांनाही कोरोनाचा सामना करावा लागू शकतो. अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
हर्ड इम्युनिटीबद्दल बोलताना गुलेरिया यांनी सांगितले की,”म्युटेशन्समध्ये किंवा नवीन स्ट्रेनमध्ये प्रतिकार शक्तीपासून बचावाची क्षमता तयार झाली आहे. त्यामुळे लसीमुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या आणि अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या माणसांनाही त्यापासून धोका होण्याची शक्यता आहे,” असा अंदाज गुलेरिया यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनीही कोरोनाच्या उद्रेकाविषयी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. देशभरात करोनाचे २४० नवीन स्ट्रेन आढळून आले आहेत. त्यामुळेच करोनाच्या संसर्गाचा वेग वाढला असून, महाराष्ट्रातही मागील आठवड्यांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे, असं जोशी म्हणाले.