राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस पक्षाचे नेते राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मारली बाजी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकूण मतदार 78 पैकी 1 सदस्याचा मृत्यू झालेला असल्याने 77 मतदार होते. यापैकी 2 जणांनी मतदानावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तर उरलेल्या सदस्यांपैकी दिग्विजय सूर्यवंशी यांना 39 तर धीरज सूर्यवंशी यांना 36 मते पडली.
अशा प्रकारे महापौर म्हणून दिग्विजय सूर्यवंशी 39 मतांनी विजयी घोषित करण्यात आले