मुंबई : पोहरादेवीमध्ये झालेल्या गर्दीबाबत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. या गर्दीप्रकरणी वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना अहवाल देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाईचे आदेश दिले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोहरादेवीमध्ये येथे झालेल्या गर्दीबाबत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.
वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.