दहावी, बारावीच्या अंतिम परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

0

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार का? ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार की ऑफलाइनच होणार? याची चर्चा सुरू होती. मात्र अखेर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक शुक्रवारी (दि. 26) जाहीर केले आहे.

त्यानुसार दहावीची बोर्ड परीक्षा 29 एप्रिल ते 20 दरम्यान होणार आहे. तर, बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची परीक्षेच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

या परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 6 या दोन सत्रात होणार आहेत. परिक्षेचे वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले आहे. एप्रिल-मे 2021 मध्ये राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या 10 वी आणि 12 वी लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर 16 फेब्रुवारीपासून उपलब्ध केले होते.

वेळापत्रकांसंदर्भात सूचना असल्यास मंडळाकडे 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत लेखी स्वरुपात मागवल्या होत्या. त्यानुसार विविध संघटना, पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्याकडून प्राप्त झालेल्या सुचनांचे अवलोकन करून 10 वी आणि 12 वीचे संभाव्य वेळापत्रक अंतिम करण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.