इंधनदरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांच आंदोलन
इंधनदरवाढ करून केंद्रसरकार दिवसाढवळ्या सामान्यनागरिकांच्या किस्सावर डल्ला टाकतय : रुपाली चाकणकर
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारबद्दल देशातील सामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष वाढत आहे. गेल्या महिन्याभरात किमान १० वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. गेल्या ८ दिवसांमध्ये तर रोज या किंमती वाढतच आहेत. त्यामुळे सरकार विरोधात यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
यावरच आज पिंपरी चिंचवड येथे देखिल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलंय. चिंचवड येथील पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं आहे. पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होर्डिंग खाली बसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यानी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केलं आहे.
यावेळी या आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष संजोग वाघेरे तसेच पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी चाकणकर यांनी बोलताना मोदी सरकारवर जोरदार टीका केली. इंधानदरवाढ करून केंद्रसरकार दिवसाढवळ्या सामान्यनागरिकांच्या किस्सावर डल्ला टाकत आहे. केंद्र सरकार जनतेची पूर्णपणे फसवणूक करत आहे. असं त्या म्हणाल्या
पुढे त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर देखील निशाणा साधलाय. चाकणकर म्हणाल्या कि, इंधन दरवाढीबाबत पेट्रोलियम मंत्र्यांना विचारले असता, हिवाळा सुरु झाला आहे म्हणून पेट्रोलचे दर वाढत आहेत. हिवाळा संपला कि दर कमी होतील. अशा पद्धतीचा अजब दावा केंद्रीय मंत्र्यांनी केलेला आहे. त्यामुळे इंधन दरवाढ कमी नाही झाली तर आम्ही राज्यभर सर्व पेट्रोल पपांवर आंदोलन करू. असा इशाराही चाकणकर यांनी केंद्र सरकारला दिला आहे.