पोलिसांना चकवा देणाऱ्या गजा मारणे वर मोका अंतर्गत कारवाई होणार; खडणीचे कलम ही वाढणार

'त्याला' पकडण्यात पोलीस कमी पडले

0
पुणे : तळोजा कारागृहातुन सुटल्यानंतर मुंबई-पुणे महामार्गावर मिरवणूक काढल्या प्रकरणी कुख्यात गजा उर्फ गजानन मारणे याच्यावर तळेगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गजा मारणेवर दाखल झालेले गुन्हे पाहता त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

गजा उर्फ गजानन मारणे आणि त्याच्या इतर सात साथीदारांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यापूर्वी तळेगाव दाभाडे आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत. तळेगाव टोल नाक्याच्या गुन्ह्यात खंडणीचे कलम वाढवले जाणार आहे.

तळोजा ते पुणे जंगी मिरवणूक काढणाऱ्या गजानन मारणे व त्याच्या साथीदार आणि समर्थकांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला व इतर 9 जणांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर शिवाजीनगर न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला.

यानंतर लागलीच पोलिसांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल केला. पण तोपर्यंत गजा मारणे फरार झाला. यात पोलिसांनी गजानन मारणे हा पोलिसांचे अटकेच्या कारवाईच्या भीतीपोटी फरार झाला, असल्याचे सांगितले. त्याच्या शोधासाठी पथके देखील रवाना केली. त्याचे फार्म हाऊस आणि कुटुंबाकडे चौकशी सुरू केली. पण आज गजा मारणे हा वडगाव मावळ कोर्टात हजर झाला. याप्रकरणी त्याला कोर्टाने जामीन दिला.. यानंतर तो निघून देखील गेला आहे.

संपुर्ण पोलीस दल त्याच्या मागावर आहे. दररोज त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस शोध घेत आहेत आणि असे असताना तो आज चक्क कोर्टात हजर झाला आणि जामीन मिळवून निघून देखील गेला. याची पोलिसांना कसलीच खबर लागली नव्हती. यावर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी खंत व्यक्त केली आणि गजा मारणे ला पकडण्यात पोलीस कुठे तरी कमी पडल्याचे स्पष्ट केले.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी आता प्रयत्न 14 वाहने आणि 36 आरोपींवर कारवाई केली आहे. यापुढे अश्या प्रकारे शहरात कोणी गुंडाराज करणार असेल तर त्याची गय केली जाणार नसल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.