‘गजा मारणे हाजीर हो…’ पोलिसांनी घरावर लावली नोटीस

0

पुणे : तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर मिरवणूक काढणाऱ्या गजा मारणे याच्या मागे पोलीस यंत्रणा हात धुवून मागे लागली आहे. मारणे याच्याविरोधात सात गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घरावर नोटीस लावली आहे.

गजा मारणे आणि त्याचे साथीदार फरार आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहीम केली. परंतु, अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.त्यामुळे आता वारजे माळवाडी पोलिसांनी गजानन मारणे याला थेट नोटीस बजावली आहे. तसेच पोलिसांनी रीतसर पंचनामा केला आहे.

निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी तळोजा कारागृह ते पुणे अशी समर्थकांसह रॅली काढली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात त्याने व त्याच्या साथीदारांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.