पुणे : तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर कारच्या ताफ्यातून मिरवणूक काढल्या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे आणि त्याच्या आठ साथीदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. भांगडिया यांनी हा आदेश दिला.
गजानन ऊर्फ गजा पंढरीनाथ मारणे (वय ४८, रा. शास्त्रीनगर), रूपेश कृष्णराव मारणे (वय ३८), सुनील नामदेव बनसोडे (वय ४०, दोघेही रा. कोथरूड), श्रीकांत संभाजी पवार (वय ३४), गणेश नामदेव हुंडारे (३९), सचिन अप्पा ताकवले (वय ३२), प्रदीप दत्तात्रेय कंधारे (वय ३६), बापू श्रीमंत बागल (वय ३४) आणि अनंता ज्ञानोबा कदम (वय ३७) यांचा जामीन फेटाळण्यात आला आहे. तर मेहबूब मोर्तुजा महम्मद सय्यद (वय ३३), राजशेखर यलप्पा बासगे (वय २६), जयवर्धन जयपाल बिरनाळे (वय २४), लक्ष्मण एकनाथ आल्हाट (वय ४०), सुनील ज्ञानोबा कांबळे (वय ३१), आशिष बापूराव पिसाळ (वय २२) आणि इतर १५० समर्थकांवर गुन्हा दाखल आहे.
समाजात दहशत निर्माण पसरविण्याच्या उद्देशाने आरोपींनी रॅली काढली. रॅलीचे चित्रीकरण करून ते समाज माध्यमांवर व्हायरल केले. मारणे व त्याचा साथीदारांना नोटीस देऊनही ते हजर झालेले नाहीत. या गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार करण्यासाठी त्यांना कोणी पैसे पुरवले याचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींना अटक करणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद जामिनाला विरोध करताना अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केला.
पोलिसांनी केलेला तपास :
– मिरवणुकीत वापरलेली ११ वाहने निष्पन्न झाली आहेत
– रॅलीचे उर्से व पुणे शहरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहे
– आठ साक्षीदारांकडे तपास करून त्याचे जबाब नोंदवले आहेत
– आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन तपास पथकांची नेमणूक
– व्हायरल फोटो आणि व्हिडिओची माहिती मिळवण्यात येत आहे
आरोपींवर दाखल गुन्हे
– गजा मारणे- २३
– रूपेश मारणे- १२
– सुनील बनसोडे – १४