नवी दिल्ली : केंद्र सरकार आता डिजिटल इंडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपल्या सेवा देण्याकडे लक्ष पुरवत आहे. त्यासाठी सरकारने एक पोर्टलदेखील सुरू केलं असून या पोर्टलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळू शकेल.
या पोर्टलच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील (एमएसएमई) कंपन्या कामगारांशी संपर्क साधतील. तसेच ज्यांना नोकरी हवी आहे, तेदेखील या अॅपच्या माध्यमातून कंपन्यांशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे बेरोजगारांसाठी ही एक चांगली संधी आहे.
गेल्याच महिन्यात हे पोर्टल पायलट प्रोजेक्ट (पथदर्शी प्रकल्प) म्हणून सुरू करण्यात आलं आहे. सध्या सक्षम पोर्टल हे काही जिल्ह्यांपुरतं मर्यादित ठेवण्यात आलं असून लवकरच त्याचा विस्तार केला जाणार आहे.