मनसुख हिरानी असे मृत्यमुखी पडलेल्या मालकाचे नाव आहे. मनसुख याच्या कुटुंबियांनी नौपाडा पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार केली होती.
स्कॉर्पिओ गाडीत पोलिसांना धमकीचे पत्र आढळून आले आहे. या गाडीत १० नंबरप्लेट आढळून आल्या असून या नंबरप्लेट ज्या गाड्यांचे आहेत, त्या गाड्यांचा शोध आरटीओच्या मदतीने घेण्यात येत आहे. या गाडीत धमकीचे पत्र मिळाले असून त्यात त्यांनी हा तर केवळ ट्रेलर आहे असे म्हटले आहे. त्यामुळे या घटनेची देशभरात गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ३ पोलीस उपायुक्तांची टीम तपासासाठी नेमण्यात आली आहे.
ही स्कॉर्पिओ बुधवारी मध्यरात्री एक वाजता कारमायकेल रोड परिसरात पार्क करण्यात आली. गाडीतून उतरलेली व्यक्ती पाठीमागून आलेल्या दुसर्या गाडीत बसली. फ्लॅश लाईट ऑन केल्यामुळे दुसर्या गाडीचा नंबर सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसला नाही. पोलिसांनी शहरातील गेल्या दोन दिवसातील सर्व सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. गाडीत सापडलेल्या सर्व नंबरप्लेटच्या गाड्यांचा शोध सुरु आहे. या स्कॉर्पिओची नंबरप्लेट बनावट आहे.
या स्कॉर्पिओमधील २० जिलेटीन कांड्यांचा स्फोट झाला असता तर परिसरातील २० ते २५ मीटरचा भाग उद्धवस्त झाला असता, असे बॉम्बशोधक व नाशक पथकाचे म्हणणे आहे.