स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांची सलग तिसर्‍यांदा निवड

0
पुणे : महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांची निवड झाली आहे. रासने यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नगरसेवक बंडू गायकवाड यांचा १० विरूद्ध ६ मतांनी पराभव केला. हेमंत रासने यांची सलग तिसर्‍यांदा स्थायी समितीअध्यक्षपदी निवड झाल्याची महापालिकेच्या इतिहासात नोंद झाली आहे.

जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. हेमंत रासने हे शनिवार, नारायण आणि सदाशिव पेठ या मध्यवर्ती भागातून चवथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडूण आले आहेत. पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सुवर्णयुग तरुण मंडळ आणि सुवर्णयुग सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहीले आहे.

२०१७ मध्ये महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे हे कॅन्टोंन्मेंट विधानसभा मतदार संघातून आमदार झाले. त्यामुळे अध्यक्षपदाची मुदत संपण्याअगोदर तीन महिने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.