पुणे : नवरा-बायको म्हटल की भांडण आलंच. मात्र पुणे पोलिसांकडे नवरा बायकोच एक वेगळंच भांडण आल आहे. यामुळे पोलिसही चांगलेच चक्रावले असून यातून कसा मार्ग काढायचा असा विचार केला. या प्रकरणात पत्नीने पोलिसांकडे तक्रार केली होती.
पुणे पोलिसांच्या भरोसा सेलकडे असं एक प्रकरण आलं आहे. कौटुंबिक तंटे सोडवण्यासाठी भरोसा सेलमध्ये समुपदेशन केले जाते. घरगुती भांडणं कायद्याच्या कक्षेत येण्यापूर्वीच समंजसपणे सोडवण्याचं काम भरोसा सेल मध्ये केलं जातं.
मागील काही दिवसापासून सोशल मीडियामुळे होणारी भांडणं भरोसा सेल मध्ये येण्याचं प्रमाण वाढलंय. त्यातलंच हे उदाहरण. नवरा-बायको दोघेही उच्चशिक्षित आहेत. बायकोला वडील नसल्यामुळे नवरा तिच्या आईची बहिणीची काळजी घेतोय, हे सगळं असलं तरी त्यांच्यात वाद होते कारण नवरा त्याच्या व्हॉट्सअॅपला तिचा डीपी ठेवत नाही. अखेर भरोसा सेलमध्ये दोघेजण आले, तिथल्या पोलिसांनी त्यांची समजूत घातली आणि हे भांडण मिटलं.
पण अशीच भांडण सध्या अनेक ठिकाणी होताना दिसतात. याच मुद्द्यावर आम्ही काही तरुणांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. बायकोचा फोटो डीपीवर ठेवायला हरकत काय. महिला एवढ्या नटून-थटून तयार होतात आणि त्यांचा फोटो ठेवला नाही तर ते नाराज होतात हे साहजिक आहे. लग्न केलं प्रेम करता तर लपवता का असं काही लोकांचं म्हणणं होतं.