स्पर्श हॉस्पिटल,वायसीएम हॉस्पिटलमधील गॅस प्रकरण व डॉ अनिल रॉय व अजित पवार या अधिकाऱ्यांची चौकशी या तीन विषयी सखोल चौकशी करण्याचा आदेश दिल्याने हे अवघड काम आयुक्त राजेश पाटील यांना करावे लागणार आहे.
आरोपामध्ये कोरोना काळातील भ्रष्टाचार, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेला उघड झालेला भ्रष्टाचार इत्यादी विषयी जोरदार चर्चा झाली. बैठकीच्या अध्यक्षा महापौर उषा ढोरे यांनी सभागृहातील नगरसेवकांची मागणी पाहता आयुक्त राजेश पाटील यांना चौकशीचे आदेश दिले असून ही चौकशी करताना त्यांची परीक्षा लागणार आहे.