पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची गँगस्टर ‘आंदेकर’ आणि ‘मटका किंग’ नंदू नाईकवर मोठी कारवाई

‘बंडू’ याच्यासह टोळीवर ‘मोक्का’ तर ‘सूर्यकांत’ आणि ‘नंदू’ ससूनमध्ये दाखल

0
पुणे : पुणे पोलिसांचा गँगस्टर आणि सक्रिय टोळ्यांना लगाम लावण्याचा धडाका आता अवैध धंदे करणाऱ्यापर्यंत येऊन पोहचला असून, आज मध्यवस्तीमधील प्रसिद्ध आंदेकर टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात मटका किंग नंदू नाईकचा देखील समावेश आहे. या मोक्काने मात्र, शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून, अवैध धंदे करणाऱ्यांच्या मनात देखील पोलिसांची धडकी भरली आहे.

याप्रकरणी सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा राणोजी आंदेकर (60), नंदू नाईक व ऋषभ आंदेकर (22), हितेंद्र यादव (32), दानिश शेख (28), योगेश डोंगरे (28), विक्रम शितोळे (34), अक्षय अकोलकर (28), स्वराज उर्फ शक्ती वाडेकर (19), प्रतीक शिंदे (18), यश चव्हाण (19), देविदास उर्फ देवा गालफांडे (21), वैभव शहापुरकर (19) अशी मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत. याबाबत ओंकार गजानन कुडले (21,रा. बांबु आळी, गणेश पेठ) या तरुणाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टोळी प्रमुख बंडू आंदेकर आणि नंदू नाईक दोघे ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. दरम्यान, मध्यवस्तीत आंदेकर टोळीची दहशत आहे. कुडले व आंदेकर टोळीतल्या काही जणांचे वाद होते. कुडले आंदेकर टोळीच्या वर्चस्वाला आव्हान देत असल्याने ( दि. 21 फेब्रुवारी) तयाच्यावर कोयत्याने वार केले होते. कुडलेवर बंडू आंदेकरच्या सांगण्यावरून साथीदारांनी वार केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करत मध्यरात्री बंडू आंदेकर व ऋषभ याला पकडण्यासाठी मोठा फोजफाटा घेऊन पोलीस गेले होते. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.