रावेत मधील मॉल मध्ये सुरु होता ‘स्पा’च्या नावाखाली उद्योग

0

पिंपरी : रावेत येथील मॉल मध्ये सुरु असलेल्या स्पा सेंटरच्या नावाखालील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने स्पा सेंटरवर मंगळवारी (दि.10) दुपारी छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली असून 5 महिलांची सुटका केली आहे.

या प्रकरणी स्पा सेंटरचा चालक आणि मालक अमोल दत्तात्रय नवले (29, रा. चाकण), तसेच स्पा सेंटरचा मॅनेजर आकाश अनिल सोनवणे (24, रा. थेरगाव) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील हर्पल यूनीसेक्स स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी (दि. 9) दुपारी त्याठिकाणी छापा टाकून कारवाई करण्यात आली. यावेळी 5 महिलांची सुटका करून आरोपींना अटक केली आहे. सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग समाधान सिसोदे यांनी या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.