यासह कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिका , नगरपरीषदा व नगरपंचायतीमधील दर्जेदार आरोग्य सुविधेसाठी ५ वर्षात ५ हजार कोटीची भरीव तरतूद केली तसेच त्यापैकी या वर्षासाठी ८०० कोटी रुपये देणार आहेत . प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पोस्ट कोविड काऊन्सिलींग व ट्रिटमेंट सेंटर सुरु करण्यात येणार आहेत . या सर्व लोकहिताच्या योजना अर्थसंकल्पात मांडल्याबद्दल राष्ट्रवादी व शिवसेना पक्षामार्फत मंगळवारी झालेल्या माहे फेब्रुवारी महिन्याच्या मा . महापालिका सभेमध्ये मा . मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे , उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हाचे पालकमंत्री अजितदादा पवार तसेच महाविकास आघाडीचा अभिनंदनाचा ठराव माडण्यात आला होता .
परंतु सत्ताधारी भाजपने त्याला विरोध दर्शविला अभिनंदन ठराव मंजुर केला नाही व आपला कोतेपणा दाखवून दिला . मागील वर्षी ज्यावेळी कोरोनाचा कहर चालू होता , सगळे उद्योग धंदे बंद होते राज्याची परीस्थिती नाजूक होती त्यावेळी राज्यशासनाने अंदाजपत्रकाच्या फक्त ३३ टक्के खर्च करण्याचे आदेश दिले होते .
परंतु त्याच काळात राज्याचे वित्तमंत्री व पुणे जिल्हाचे पालकमंत्री अजितदादा यांनी कोणतेही पक्षीय राजकारण न करता भाजपची सत्ता असलेल्या आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सुमारे १८०० कोटीच्या विविध विकास कामांना मंजुरी दिली होती . यापूर्वी तत्कालिन सभागृहनेते एकनाथ पवार केंद्रात एकादा निर्णय झाल्यास उदा . जम्मू काश्मिर मधिल ३७० कलम हटविणेवावत कायदा समंत केला तेव्हा त्यांनी मा . महापालिका सभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होता त्यावेळी आम्ही मोठ्या मनाने त्यांचे अभिनंदन केले होते .
आम्ही यात कुठलेही राजकारण केले नाही . जी चांगली गोष्ट झाली तिला आम्ही पाठींबा दिला यात पक्षीय राजकारण केले नाही . परंतु भाजपचे पदाधिकारी आणि एकनाथ पवार यांनी कालच्या महाविकास आघाडीच्या अभिनंदनाच्या ठरावाला विरोध करुन पक्षीय राजकारण केले . तसेच राजकीय अपरीपक्वता दाखवून दिली .