पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराकरीता भामा आसखेड धरणातून ६०.७ ९ दशलक्ष घनमीटर पाणी पुन : आरक्षित करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे . या बिगर सिंचन पाणी आरक्षणापोटी सिंचन पुनर्स्थापना खर्च शासनाकडे भरावा लागणार आहे . या खर्चाचा पहिला हप्ता ३५ कोटी ५५ लाख पुणे पाटबंधारे विभागास यांना अदा केला जाणार आहे . तर आंद्रा धरणातून ३६.८७ दशलक्ष घनमीटर पाण्याचा पुनर्स्थापना खर्चाचा तिसरा हप्ता २० कोटी १६ लाख पुणे पाटबंधारे विभागास अदा केला जाणार आहे . या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली .
तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुणे महानगर परिवहन मंडळाला २७ कोटी रुपये अदा करण्याचे मान्यता दिली.
प्रभाग क्र . २ बो-हाडेवाडी येथील ताब्यात येणा – या गायरान जागेतील आरक्षणावर शाळा इमारत बांधण्याच्या कामामध्ये विद्युत विषयक कामे करण्यासाठी आणि जाधववाडी येथील नवीन शाळेचे विद्युतीकरण करण्यासाठी ५२ लाख रुपये खर्च येणार आहे . या खर्चासदेखील स्थायी समितीने मान्यता दिली .