कारवाई न करण्यासाठी 1 लाखाची लाच घेणारा पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

0
मुंबई : मालवणी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई गणेश साळुंखेला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने रंगेहाथ पकडले. मंगळवारी रात्री मालवणी बीट क्रमांक ५ जवळ हि कारवाई केली. एमपीडीएची कारवाई न करण्यासाठी दहा लाखांच्या लाचेची मागणी केली होती.

मालवणीच्या अंबुजवाडी परिसरात तक्रारदार राहत असून ते घर दुरुस्तीचे काम करतात. काही दिवसांपूर्वी गणेश साळुंखे यांनी तक्रारदारांना बीट चौकीत बोलवले होते. तुम्हीं ८०हुन अधिक रूम बांधल्याची तक्रार आली आहे त्यामुळे तुम्ही आणि तुमच्या मुला विरोधात एमपीडीए कारवाई करावी लागेल. त्यावेळी कारवाई न करण्यासाठी तक्रारदारांकडे १० लाखाची लाच मागितली. ही रक्कम जास्त असल्याने तडजोडीअंती पाच लाख रुपये देण्याचे ठरले. त्या पाच लाखांपैकी तीन लाख रुपये तक्रारदारांनी साळुंखे यांना दिले. उर्वरित रकमेसाठी गणेश हे तक्रारदारांना सतत फोन करत होता. त्यानंतर तक्रारदारानी एसीबीत धाव घेतली. घडलेला सर्व प्रकार सांगितला.

एसीबीच्या पथकाने खातरजमा करून मंगळवारी रात्री एसीबीच्या पथकाने मालवणी बीट क्रमांक ५ जवळ साध्या वेशात सापळा रचला. रात्री गणेश हा एक लाख रुपयांचा हप्ता घेण्यासाठी आला होता. तेव्हा त्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

Leave A Reply

Your email address will not be published.