अखेर सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची बदली

0

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या मृत्यु प्रकरणी गंभीर आरोपामध्ये सापडलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची अखेर मुंबई पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. सचिन वाझे हे मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुप्तवार्ता विभागात प्रमुख होते.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या कारमध्ये जिलेटिनच्या काड्या सापडल्या. या कारची मालकी असलेल्या मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यु झाला. त्यांच्या पत्नीने सचिन वाझे यांनीच त्यांचा खुन करविला असा आरोप केला आहे.

त्यामुळे विधानसभेमध्ये सचिन वाझे यांच्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांची बदली करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता सचिन वाझे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.