मुंबई: सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक त्यांची 13 तास कसून चौकशी केली. या चौकशीत NIAच्या हाती काहीतरी सबळ पुरावा लागल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
याप्रकरणी आता ठाण्यातील एका राजकीय नेत्याची चौकशी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सचिन वाझे आणि एका राजकीय नेत्याचे संबंध असल्याचा आरोप केला होता.
NIAच्या चौकशीतही नेमकी हीच माहिती पुढे आल्याचे सांगितले जात आहे. ठाण्यातील हा नेता आणि सचिन वाझे यांचे आर्थिक संबंध होते. त्यामुळे आता याप्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या संपूर्ण कटात सचिन वाझे यांच्यासह पाच ते सात जणांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता NIA कडून मुंबई पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊ शकते. ठाण्यातून आणखी काही जणांना लवकरच ताब्यात घेतले जाऊ शकते. यामध्ये इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक आणि एका व्यावसायिकाचा समावेश असल्याचे सांगितले जाते.