लोकशाही आणि घटनेने दिलेली जबाबदारी न पाळणारे राज्यपाल

0

बारामती : महाराष्ट्राने इतिहासात लोकशाही आणि घटनेने दिलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधीच पाहिला नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

बारामती येथे आज पत्रकारांनी शरद पवार यांना राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. राज्यपालांकडे जी जबाबदारी असते आणि घटनेने राज्यसरकारला व मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत त्या अधिकारानुसार शिफारशी झालेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी राज्यपालांची असते असेही शरद पवार म्हणाले.

मोदीसाहेब स्वतः ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी राज्यपालांकडून त्यांना अशाप्रकारची अडवणूक होत असल्याची त्यांची तक्रार होती. तसे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले होते हे माझ्या पाहणीत आहे. दुर्दैवाने त्यांना हे सहन करावं लागलं हे त्यांच्या राज्यातसुध्दा. महाराष्ट्रासारख्या राज्यात राज्यपाल करतायत आणि असे असताना केंद्रसरकार बघ्याची भूमिका घेतेय ही गोष्ट चिंताजनक असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पाच राज्यांमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल, असा दावा शरद पवार यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.