उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 673 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरीतील 29 वर्षाचा युवक, वडमुखवाडीतील 83 वर्षीय पुरुष, संत तुकारामनगर येथील 53 वर्षीय पुरुष आणि वाकड येथील 57 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
शहरात आजपर्यंत 1 लाख 14 हजार 754 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 5 हजार 929 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1880 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 790 अशा 2670 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.
सध्या 1436 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1315 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 68 हजार 234 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 4915 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.