राहुल कलाटे यांचा शिवसेना गटनेते पदाचा राजीनामा

0
पिंपरी : राहुल कलाटे यांचा शिवसेना गटनेते पदानामा दिला आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी आठ सदस्यांची निवड झाली.त्यात शिवसेनेच्या कोट्यातून अश्विनी चिंचवडे यांचे नाव पक्षाने दिले होते .

परंतु , कलाटे यांनी पक्षादेश डावलून आपल्या समर्थक मीनल यादव यांचे नाव दिल्याने त्यांच्या गटनेतेपदावर संक्रांत आली . गटनेतेपदी काम करत असताना स्वतःच्या मर्जीतील लोकांना पदे वाटून आपण पक्षशिस्तीचा भंग केला आहे . पक्षाचा आदेश न पाळता वेगळाच अजेंडा राबवला.

त्यामुळे आपण महापालिका शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा त्वरित महापौर व विभागीय आयुक्तांकडे द्यावा, असा आदेश राऊत यांनी कलाटे यांना दिला आहे . त्यामुळे आज कलाटे यांच्या राजीनामा दिला .

Leave A Reply

Your email address will not be published.