‘त्या’ मर्सिडिज गाडीशी भाजप नेत्याचे संबंध

0

मुंबई : अंबानी यांच्या घराशेजारी स्फोटकांनी सापडलेली गाडी प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.  सचिन वाझे यांच्याकडून एनआयएच्या टीमने मर्सिडिज गाडी जप्त केली आहे. पण या गाडीसोबत भाजप नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

एनआयएच्या टीमला सचिन वाझे वापरत असलेली एक मर्सिडिज कार सापडली आहे. या कारमध्ये पाच लाखांची रोकड आणि पैसे मोजणारी मशीन सापडली आहे. पण, आता या कारमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सचिन सावंत यांनी ट्वीट करून या गाडीसोबत भाजप पदाधिकाऱ्याचा संबंध असल्याचा दावा केला आहे.

मनसुख हिरेन यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी हिरेन यांनी एका मर्सिडीज गाडीतून प्रवास केला. त्याच मर्सिडीज कारसोबत ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी देवेन हेमंत शेळके (Deven Hemant Shelke) यांचे फोटो आहे. देवेन शेळके यांची 17 ऑक्टोबर 2020 रोजी भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे ग्रामीणच्या सचिवपदी निवड करण्यात आली होती. याबद्दलचे नियुक्ती पत्रच सचिन सावंत यांनी ट्वीट केले आहे.

मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्या दिवशी याच गाडीतून प्रवास केला होता. आता याबद्दल भाजप नेत्यांनी खुलासा करावा, अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली.

Now BJP connection emerges – the Mercedes car allegedly used by Mansukh Hiren on 17th February is seen in a photograph of BJP office bearer of Thane.

Would @BJP4Maharashtra leaders give explanation? pic.twitter.com/w64FAyfDpi

— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 17, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.