दिल्लीतील आरएमएल हॉस्पिटलजवळील गोमती अपार्टमेंटमध्ये त्यांचे निवासस्थान आहे. येथील एका झाडाच्या फांदीला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. शर्मा यांच्या मृत्युमुळे भाजपची आज होणारी संसदीय दलाची बैठक रद्द करण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील जोगिंदरनगर येथे राहणारे रामस्वरुप शर्मा लागोपाठ दुसर्यांदा खासदार बनले होते. ते राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे जुने कार्यकर्ते होते. पोलीस घटनास्थळी पोहचले असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.