पिंपरी चिंचवड शहरात धोका वाढतोय; 1248 नवीन कोरोना रुग्ण

0

पिंपरी : शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या संख्येने वाढ होत असून 24 तासात 1248 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली आहे. शहरातील तीन आणि महापालिका हद्दीबाहेरील दोन जणांचा आज मृत्यू झाला आहे.

पिंपरीतील 58 वर्षीय पुरुष, पिंपळेनिलख येथील 80 वर्षीय महिला, फुगेवाडीतील 94 वर्षीय वृद्ध महिला, लोहगाव येथील 35 वर्षाचा युवक, भांगरवाडीतील 60 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 16 हजार 896 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 7 हजार 96 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1888 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 792 अशा 2680 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 1749 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1506 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 76 हजार 813 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 3999 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.