फेडरेशन कप साठी पिंपरी चिंचवडच्या ‘तन्वीर हक’ हिची निवड

0
पिंपरी : मूंबई येथे होणाऱ्या राष्ट्रीय फेडरेशन कप या स्पर्धेसाठी घेतलेल्या निवड चाचणीत पिंपरी-चिंचवड ची “तन्वीर हक” हिने ‘सिनियर वमून बॉडिबिल्डींग’ या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामुळे तिची निवड झालेली आहे.

महाराष्ट्र राज्य बॉडिबिल्डींग असोसिएशन तर्फ दिनांक १३ मार्च २०२१ रोजी मूंबई येथे राष्ट्रीय फेडरेशन कप या स्पर्धेसाठी घेतलेल्या निवड चाचणीत पिंपरी-चिंचवड ची “तन्वीर हक” हिने ‘सिनियर वमून बॉडिबिल्डींग’ या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. दिनांक ३/४ एप्रिल २०२१ रोजी लखनऊ येथे होणार्या फेडरेशन कप या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली.

आजपर्यंत तीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला असून २०१८ मध्ये बालेवाडी पूणे येथे झालेल्या एशियन स्पर्धेत वमून ॲथलेटिक्स या प्रकारात सिल्व्हर मेडल, तसेच मी इंडिया वूमन बॉडिबिल्डींग प्रकारात टॉप ५ व २०२० मध्ये झालेल्या महाराष्ट्र श्री या राज्यस्तरीय स्पर्धेत ब्राझ मेडल पटकावले आहे.

यंदाच्या महाराष्ट्र श्री या स्पर्धेवर कोरोनाचे सावट आहे, या स्पर्धेसह भारत श्री या स्पर्धेसाठी ती मेहनत घेत आहे. तिला पिंपरी-चिंचवड बॉडिबिल्डींग फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशनचे सहकार्य मिळत असून संघटनेचे सचिव महेश गणगे, व अध्यक्ष किरण सांवत तसेच कोच मयूरेश मोरे यांचे मार्गदर्शन मिळत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.