गोल्डन अवर उपचाराद्वारे ब्रेन स्ट्रोकचे धोके टाळता येतील : कृष्णप्रकाश

0
पिंपरी : लोकमान्य हाॅस्पिटल व आयकार्डिन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य हाॅस्पिटल, निगडी येथे” स्ट्रोक केअर सेंटर” सुरु करण्यात येत आहे .याचे उद्घाटन महापौर माई ढोरे व पिं चिं पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी माजी उपमहापौर शैलजा मोरे, लोकमान्य हाॅस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डाॅ. नरेंद्र वैद्य, आयकिर्डिनचे संचालक समीर मोरे, न्युरो फिजिशियन डाॅ. अमितकुमार पांडे, डाॅ.निहार इंगळे, डाॅ. किरण नाईकनवरे, असो.व्ही .पी. डाॅ. श्रीकृष्ण जोशी, ग्रुप सि.ओ.ओ. सुनिल काळे , भाजप युवा संघटनेचे श्री. अनुप मोरे उपस्थित होते.

हार्ट अँटँक, अपघात याविषयी लोकामध्ये जागृती आहे. पण आजही ब्रेन स्ट्रोक बाबत लोक अनभिज्ञ आहेत.गोल्डन अवरमध्ये तातडीक सेवा मिळाली तर यामुळे उपचारा अभावी होणारे कायमचे अंपगत्व दुष्प परिणाम तसेच प्रसंगी उद्भवणारी जिवीतहानी टाळता येवु शकते. हे काम अत्यंत महत्वाचे असल्याने हा उपक्रम पिं चि.मधील नागरिक मुख्यतः ज्येष्ठ नागरिकांसाठी फारच उपयुक्त आहे. लोकमान्य ने कोविडच्या काळातील गरजुची केलेली सेवा ही खरी ईश्वरसेवा असुन त्यांनी हा लोकसेवेचा रथ “चरैवती,चरैवती “असाच चालत ठेवावा असे गौरवोद्गार पिंचिं पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी काढले.

अत्याधुनिक तंत्रज्ञान व सर्मपित डाॅक्टरांची टीम यांच्या संयुक्त प्रयत्नाने ब्रेन स्ट्रोक, इपिलेप्सी, न्युरो डिसाॅडर्स आदि समस्यांवर वेळीच उपलब्ध होतील. पाश्चित्य देशाप्रमाणे जागतिक स्तरावरील प्रोटोकाॅलचे पालन करुन एक उत्तम सुविधा या सेंटरच्या माध्यमाव्दारे देण्यात येईल व अपघातग्रस्तांना जशी तातडीक सेवा देवुन लाखो लोकांचे प्राण वाचविण्याचे काम केले तसेच हे काम निष्ठेने करण्यात येईल असे डाँ.नरेंद्र वैद्य यांनी सांगितले.

या सेंटरची संकल्पना व प्रास्ताविक सुप्रसिद्ध न्युरोफिजीशियन डाॅ. अमितकुमार पांडे यांनी केले.

तोंड वाकडे होणे, हाता पायातील ताकद कमी होणे, तोतरे बोलणे,जीभ जड वाटणे, बेशुद्घ होणे अशी लक्षणे असल्यास नागरिकांनी 9822242100 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यास मोफत अँम्ब्युलसची सेवा रुग्णांना उपचारासाठी देण्यात येईल अशी माहिती डाॅ.।श्रीकृष्ण जोशी यांनी दिली. समीर मोरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.