अमरावती : अमरावती शहरात पत्नी सोबत विकृती करणाऱ्या पतीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती शेजारच्या अल्पवयीन मुलाला उभे करून त्याच्यासमोर पत्नीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता. याबाबत पतीविरुद्ध खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
खोलापुरी गेट पोलिसांनी या प्रकरणात पतीविरुद्ध भादंविचे कलम ३५४ (क) सहकलम १२ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, सदर मुलगा हा या दाम्पत्याच्या घराशेजारी राहतो. आई-वडील दगावल्याने अनेक वर्षांपासून सदर मुलाकडे आरोपी पती व त्याची पत्नीने लक्ष दिले. त्याच्या संगोपनासाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, सदर महिलेला त्याचा मुला समान लळा आहे. या दाम्पत्यालाही तीन अपत्ये आहेत.
दरम्यान, आरोपी पती हा पत्नीशी रात्रीच्या सुमारास कामक्रीडा करीत असताना अल्पवयीन मुलाला झोपेतून उठवून घरी आणत असे आणि त्यांच्या शयनकक्षात गुपचूप उभे करून त्यांचे अवलोकन करायला लावत असे. मामा कशासाठी नेतात, हे प्रारंभी त्याला कळतदेखील नव्हते. दुसरीकडे पत्नीलाही हा प्रकार माहिती नव्हता. एके दिवशी महिलेला सदर मुलाला घरात असल्याचे निदर्शनास आले आणि ती हादरलीच. पतीला याबाबत विचारणा केल्यावर त्याने त्याची ही विकृती कथन केली.