अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार वर छापा, २४५ जणांवर कारवाई

0

मुंबई : मुंबईच्या ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील ‘अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार’ वर बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या आरोग्य विभागातील पथकाने या हॉटेलवर धाड टाकून तब्बल २४५ विना मास्क असलेल्या नागरिकांवर कारवाई केली. तसेच, अनेक जणांवर कोरोना महामारीअंतर्गत गुन्हेही नोंद करण्यात आले आहेत.

मुंबईत व्यापारी, दुकानदार आणि हॉटेल व बार व्यवसायिकांनाही नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, अनेक हॉटेल्स आणि बार रेस्टॉरंटमध्ये कोरोना नियम धाब्यावर बसविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मध्यरात्री कारवाई करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.