यावेळी योगेश बहल म्हणाले, महापालिकेने जागेची मुळ रक्कम २५% देणे लागते.पण ५०% रक्कम देणे महापालिकेची जबाबदारी नाही. तसेच ठराविक लोकांच्या फायद्यासाठी महापालिका धंदा करण्यासाठी ऐंजन्टगिरी करते का? महापालिका पंतप्रधान आवास योजना अंतर्गत पुनर्वसन करत नसेल तर पंतप्रधान आवास योजनेचे नाव लावता कशाला? याचा मागे कोण? जागेचे मालक कोण असे प्रश्न उपस्थित केले.
यावर पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, आम्ही गरिबांनसाठी घरे बांधणार आहोत. आम्ही गरिबांनसाठी काम करतो. स्वतःच्या फायद्यासाठी धंदा करत नाही. असेले आरोप आमच्यावर होत असेल तर खपून घेतले जाणार नाही.असे त्यांनी प्रतिउत्तर दिले.