येत्या 23 मार्च रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर पदासाठी निवडणुक होणार आहे. आज दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज भरण्यात आले आहेत. राष्ट्रवादी कडून नगरसेवक पंकज भालेकर तर भाजपकडून हिराबाई नानी घुले यांचा अर्ज भरण्यात आला. ही माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.
महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपचाच उपमहापौर होणार आहे.पण नगरसेवक वसंत बोऱ्हाडे आणि नगरसेवक रवी लांडगे दोन नावे चर्चेत होती.पण ऐनवेली नावे बदलण्यात आली. त्यामुळे उपमहापौर कोण होणार हे अस्पष्ट आहे.
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अवघ्या ५ महिन्याच्या कालावधीत घोळवे यांनी दिला राजीनामा आहे. वैयक्तिक कारणाने राजीनामा दिला असल्याचे स्पष्टीकरण पक्षाच्यावतीने देण्यात आले आहे. त्यामुळे उपमहापौर पद हे रिक्त झाले आहे.