मुंबई : मुंबई पोलिस आयुक्त पदावरून उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्या पत्राने राज्यात उडवून दिली आहे.मात्र याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून पत्राबात शंका उपस्थित करण्यात आली होती. पण यावर आता परमबीर सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना परमबीर सिंग यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवेलं पत्र माझ्याच ई-मेल आयडीवरुन पाठवलं आहे. परमबीर सिंग यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर आता राजकीय वातावणर आणखी तापण्याची शक्यता आहे. यावर मुख्यमंत्री कार्यालायाकडू काय स्पष्टिकरण येतेय हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.
परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे , त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता [email protected] असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येते.