वाढती कोरोना रुग्ण संख्या त्यातच शहरातील सामान्य नागरिकांना बाजारातील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे महाग असल्याने दर परवडत नाही. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचेही महापौर व पक्षनेते यांनी सांगितले.
राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये रेमडेसिव्हर इंजेक्शन मोफत उपलब्ध आहे. महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध त्वरित मिळावे. तसेच डॉक्टरांनी हे इंजेक्शन लिहून दिल्यानंतर ते प्राप्त करून घेताना रुग्णांच्या नातवाईकांची धावपळ होते. औषधांची किंमत जास्त असल्यामुळे जास्त रक्कम खर्च होते. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोविड -19 रुग्णांना वेळेत इंजेक्शन मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.