मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांचे हैराण

0
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीत जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे . त्यामुळेच नदीकाठच्या भागात मच्छरांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे . प्रभाग क्र .२८ रहाटणी – पिंपळे सौदागरमधील नागरिकांचे जनजीवन या मच्छछांमुळे हैराण झाले आहे.

तरी महापालिका प्रशासनाने याची तातडीने दखल ख्यावी , तसेच या परिसरात मच्छरांचा बंदोबस्त करण्यासाठी दररोज धूर फवारणी करण्यात यावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहेpune

. यासंदर्भात नाना काटे यांनी ‘ ड ‘ प्रभागाचे आरोग्य अधिकारी यांनी निवेदन दिले आहे . त्यात म्हटले आहे की , प्रभाग क्र .२८ रहाटणी – पिंपळे सौदागर मध्ये सध्या मच्छरांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे .

त्यामुळे सोसायटीमधील व बैठ्या घरातील नागरिक विशेषतः ज्येष्ठ नागरिक व लहान मुले मच्छरामुळे हैराण झालेले आहेत . त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिक आजारी पडत आहेत .

त्यासाठी नागरिकांकडून मच्छरांबाबत अनेक तक्रारी येत आहेत . त्यावर नियंत्रणासाठी प्रभागामध्ये दररोज धूर फवारणी करण्यात यावी अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.