न्यायालयीन कामकाज दोन शिफ्टमध्ये

0
पुणे : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयातील कामकाज आता सकाळी १०.३० ते दुपारी १ आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ४ अशा दोन शिफ्टमध्ये सुरू राहणार आहे. या कालावधीमध्ये ज्यांच्या प्रकरणांची सुनावणी आहे अशा वकील, पक्षकारांनाच न्यायालयात प्रवेश देण्यात येणार आहे.
न्यायालयात दररोज हजारोच्या संख्येने वकील, पक्षकार दाखल होत असतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यायालयात होणारी गर्दी लक्षात घेता ऊच्च न्यायालयाने पुणे जिल्हा न्यायालयाती कामकाजा बाबत नवी नियमावली लागू केली आहे. नव्या नियमानुसार न्यायालयीन कामकाज सकाळी १०.३० ते १ आणि दुसरी १.३० ते ४ अशा दोन शिफ्टमध्ये सुरू राहणार आहे.
न्यायालयीन कामकाज करताना  वकील, पक्षकार, साक्षीदार किंवा आरोपी हजर नसतील तर त्यांच्या विरुद्ध आदेश पारित केला जाणार नाही. न्यायालयीन कामकाजांच्या दैनंदिन बोर्डवर मोजक्याच कामांचा उल्लेख करण्यात येणार आहे. बोर्डावर उल्लेख असलेले खटलेच्या कामकाज त्या दिवशी चालेल. न्यायालयाच्या आवारामध्ये ज्यांच्या खटला असेल अशाच वकील, पक्षकारांना प्रवेश दिला जाईल. जोपर्यंत पुकारल जात नाही तोपर्यंत न्यायालयीन कक्षामध्ये प्रदेश दिला जाणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  लागू करण्यात आलेल्या आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत, असे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सतिश मुळीक यांनी सांगितले.
कोट :
 न्यायालयातील कामकाज संपल्यानंतर तात्काळ न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडावे. नव्या नियमावलीचे पालन सर्वांनी करावे. ही नवी नियमावली ९ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.
अ‍ॅड. सतिश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन
Leave A Reply

Your email address will not be published.